Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : चंद्र आपल्या हस्त नक्षत्रातून बाहेर पडेल आणि मंगळाच्या चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल तसेच, कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. वाचा तिन्ही राशींचे भविष्य.
आज चंद्राची स्थिती लक्षात घेता कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चागला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज चंद्रबल अनिष्ट असल्याने वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
आज कालाष्टमीच्या चंद्र भ्रमणात आपणास मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. घरात आणि घराबाहेर मानसिक अस्वस्थता जाणवली तरी आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ रहाल. थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाचा मेळ घातला तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.