मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांना प्रवास निरर्थक ठरेल, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांना प्रवास निरर्थक ठरेल, वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 04, 2024 10:42 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 4 february 2024 : आज ४ फेब्रुवारी २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज रविवार रोजी, चंद्र वृश्चिक राशीत आणि विशाखा व अनुराधा नक्षत्रात भ्रमण करणार आहे. कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज अनिष्ट स्थानातून होणारं चंद्रभ्रमण लक्षात घेता घरात आणि घराबाहेरचे विचार मनात येतील आणि ते अमलातही आणाल. प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. अशावेळी चुकते कुठे हे कळण्यासाठी त्यातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष दयावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०६, ०८.

सिंह: 

आज चंद्रबल लाभणार आहे. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक घडी बसेल. संतती साठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. स्वतःला प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या: 

आज आज ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.