Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज चंद्र सिंह राशीत संक्रमण करेल, रवि-मंगळ-बुध या तिन ग्रहांचा नवमपंचम योग तयार होत आहे. वाचा कर्क,सिंह व कन्या राशीचे भविष्य!
आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शैक्षणिक कार्यासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे.
शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.
आज प्रीती योगात अपेक्षित कार्य पूर्ण करण्या साठी कसरत करावी लागेल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. फटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे. आर्थिकबाबतीत व्यवहार सावधानी पूर्वक करावेत.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.
आज चंद्राचं बलं चांगलं लाभल्याने प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. कर्जप्रकरणात दिलासा मिळेल.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.