मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : वेतनवाढीचा योग, उद्योगात फायदा! पाहा तिन्ही राशींचे भविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : वेतनवाढीचा योग, उद्योगात फायदा! पाहा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 03, 2024 08:50 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 3 january 2024: बुधवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : चंद्र-केतु युती व राहु-चंद्र प्रतियोग आणि शोभन योगात दिवस कसा असेल! वाचा कर्क,सिंह व कन्या राशीचे आजचे भविष्य!

कर्कः 

आज चंद्र संक्रमणात उत्तम दिवस आहे. वडिलो पार्जित मालमत्तेबाबतचा जुना वादही मिटू शकतो. गुप्तपणे काम करत राहावे आणि यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. कौटुंबिक जीवन खूप चांगले ठेवेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. आरोग्य उत्तम राहील.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०५, ०८.

सिंहः 

आज बुध-चंद्र योगात आर्थिक दृष्टीकोनातून समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष दयावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. अविचारी निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते. संततीविषयी चिंता निर्माण होईल. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. दुर्व्यसनांपासून सावध रहा.

शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०४, ०६.

कन्या: 

आज चंद्रभ्रमणात कुंटुंबात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षे प्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. व्यापार उद्योगात फायदा होईल. खर्च मात्र विचार करून करा. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०२, ०६.

WhatsApp channel