Kark Sinh Kanya Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांनी कर्ज घेण्यापासून लांब राहा! वाचा तिन्ही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांनी कर्ज घेण्यापासून लांब राहा! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांनी कर्ज घेण्यापासून लांब राहा! वाचा तिन्ही राशींचे भविष्य

Jan 25, 2024 09:24 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 25 january 2024: आज २५ जानेवारी २०२४ गुरुवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज गुरुवार रोजी, चंद्रदेव रवि प्लुटो या ग्रहांशी प्रतियोग करीत असुन गुरुपुष्यमृत योग कोणत्या राशीसाठी अनुकुल असेल! कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज चंद्र गोचरात मनातील उत्तेजना वाढीस जाईल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडणाचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेला बरा राहील. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा राहील. व्यापारउद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. चंगळवादाकडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०७.

सिंहः 

आज चंद्र-रवि प्रतियोगात व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल. परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकां मध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावध गिरी बाळगा. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा पूर्व, शुभअंकः ०५, ०८.

कन्या: 

आज गुरू चंद्राच्या प्रभावात कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. प्रभावात अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

Whats_app_banner