Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज बुधवार रोजी, चंद्राचा शनिशी नवमपंचम योग होत असुन विष्कंभ आणि वैधृती योगात कसा असेल कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज चंद्र शनिशी संयोग करीत असल्याने आर्थिक प्रगती होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. बेकारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची काळजी घ्या. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.
आज चंद्र-गुरू प्रतियोगात तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कलेच्या आणि संगणक क्षेत्रातअसणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र-मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकता विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.
आजच्या चंद्रभ्रमणात कोणत्याही परिस्थितीचा भेद करून तुमच्या पुढे येण्याच्या इच्छेला पूरक वातावरण लाभेल. तरीसुद्धा अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगाला तोंड द्यावे लागेल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.
शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.
संबंधित बातम्या