मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  kark sinh kanya horoscope today : अतिगंड योग कर्क राशीसाठी आव्हानात्मक, वाचा सविस्तर भविष्य

kark sinh kanya horoscope today : अतिगंड योग कर्क राशीसाठी आव्हानात्मक, वाचा सविस्तर भविष्य

HT Marathi Desk HT Marathi
Feb 24, 2024 12:44 PM IST

cancer leo virgo rashi bhavishya today 24 February 2024 : सिंह आणि कन्या राशीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. मात्र, कर्क राशीला अतिगंड योग आव्हानात्मक ठरेल.

kark sinh kanya horoscope today
kark sinh kanya horoscope today

 

कर्क

अतिगंड योग आहे. अपेक्षित कामं पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. वागण्यात विसंगती आढळल्यामुळं घरचे लोक जाब विचारतील. अविचारानं निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढेल. तज्ज्ञ व जाणकारांचे सल्ले घेतल्यास फायदा होईल. नोकरीत अनुकूल वातावरण असेल. व्यवसायाचा विस्तार होईल. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी अधिक कष्ट करावे लागतील. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात व मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रह अनुकूल आहेत. नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल. कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे. शुभ रंग: गुलाबी शुभ दिशा: वायव्य. शुभ अंकः ०६, ०९.

सिंह

आज चंद्रबल शुभ आहे. प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनंच काम करण्याच आग्रह धरू नका. दुसऱ्यांचा विचारही घ्या. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. जोडीदाराचं उत्तम सहकार्य मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचं प्रमाण बिघडल्यामुळं कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमीन व्यवहार लाभदायी ठरेल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी वसूल होतील. शुभ रंगः लालसर शुभ दिशाः पूर्व. शुभ अंकः ०१, ०९.

कन्या

बुध-चंद्र योगात ग्रहमान आज अनुकूल आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्यामुळं मानसिक शांतता लाभेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. व्यावसायिक कामाचा वेग वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना बहर येईल. तरुणवर्गासाठी काळ अनुकूल आहे. नवनवीन संधी चालून येतील. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. अधिक मेहनत करावी लागेल. जबाबदारीनं काम करा. वेळेच्या योग्य नियोजनाचा फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदपत्र व्यवस्थित तपासा. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०६.

WhatsApp channel

विभाग