Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज मंगळवार रोजी, भौमप्रदोष दिनी चंद्राचा मंगळ, बुध आणि शुक्राशी प्रतियोग होत असून, वैधृती योगात कसा असेल कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.
शुभरंग: भगवा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०६.
आज शुक्र-चंद्र योगात आपणास दिनमान उत्तम राहील. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्ती पासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आपला आत्म विशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल.स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. एकंदरीत आजचं दिनमान उत्तम आहे. आकस्मिक धनलाभ होईल.
शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्र रवि बुधाशी योग करीत आहे. आपला राशीस्वामी मंगळ उत्तम स्थितीत आहे. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभाग समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.