Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज सोमवार रोजी, मृगशीर्ष या मंगळाच्या नक्षत्रातुनही चंद्राचं गोचर होत असल्याने सप्ताहातील पहिल्याचं दिनमानावर मंगळाचा विशेष प्रभाव राहील. कसा असेल कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज ऐंद्र योगात बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहिल. कुटुंबात मंगल कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज मंगळाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात आपणास शुभअशुभ अशी समिश्र स्वरुपाची फळे मिळतील. अनिष्ट चंद्र भ्रमणात मनातील संयशावृती वाढेल. कडक बोलण्या मुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल. आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मुलांच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्रावून जाल भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा.
शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज अमृत योगात आपणास आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. बौद्धीक गोष्टींकडे ओढा राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०९.