Kark Sinh Kanya Rashi Prediction : वातावरण आनंदी राहील! कर्क, सिंह व कन्या राशींचे वाचा राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : वातावरण आनंदी राहील! कर्क, सिंह व कन्या राशींचे वाचा राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : वातावरण आनंदी राहील! कर्क, सिंह व कन्या राशींचे वाचा राशीभविष्य

Jan 21, 2024 10:46 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 21 january 2024: आज २१ जानेवारी २०२४ रविवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज रविवार रोजी, चंद्र वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. चंद्र शनिशी षडाष्टक योग करत आहे. तसेच शुक्ल आणि ब्रह्म योगात कसा असेल कर्क, सिंह व कन्या राशीसाठी सुट्टीचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज चंद्र अनुकूल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणीं कडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०६.

सिंह: 

आज पुत्रदा एकादशी दिनी व्यापारात व्यवहाराची सांगड योग्य रितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळपणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबा तील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०४, ०७.

कन्या: 

आज ब्रह्मा योगात प्रयत्न सफलदायक ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात आघाडीवर राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner