Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज विष्टी करण आणि शुभ सौभाग्य योग काही राशींसाठी सौभाग्यशाली ठरणार आहे. वाचा कर्क,सिंह व कन्या राशीचे आजचे भविष्य!
आज चंद्र-रवि आणि मंगळाशी संयोग करीत आहे. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील.भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. आपल्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.
शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज चंद्र-मंगळ संयोगाय अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे.व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
शुभरंग: लाल, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्रबल मिळाल्याने नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान सुख लाभेल.
शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०१, ०४.