Kark Sinh Kanya Rashi Prediction : निश्चित यश मिळेल! कर्क, सिंह व कन्या राशींचे वाचा राशीभविष्य-kark sinh kanya rashi prediction today 19 january 2024 cancer leo virgo zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : निश्चित यश मिळेल! कर्क, सिंह व कन्या राशींचे वाचा राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : निश्चित यश मिळेल! कर्क, सिंह व कन्या राशींचे वाचा राशीभविष्य

Jan 19, 2024 10:02 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 19 january 2024: आज १९ जानेवारी २०२४ शुक्रवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज शुक्रवार रोजी, चंद्र मेष राशीत संक्रमण करणार आहे तर साध्य योगाचा प्रभाव राहील. अशात कर्क, सिंह व कन्या राशीसाठी दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

कर्कः 

आज आपणास अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

सिंहः 

आज आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टींबाबत निरीच्छ रहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०५, ०७.

कन्याः 

आज नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार यासाठी अनुकुलता राहिल. परदेशगमनाचे योग येतील. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल रहिल. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभणार आहे.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.