Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क व सिंह राशीसाठी उत्तम दिवस तर कन्या राशीच्या लोकांची फसवणूक होईल! वाचा भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क व सिंह राशीसाठी उत्तम दिवस तर कन्या राशीच्या लोकांची फसवणूक होईल! वाचा भविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क व सिंह राशीसाठी उत्तम दिवस तर कन्या राशीच्या लोकांची फसवणूक होईल! वाचा भविष्य

Jan 18, 2024 09:30 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 18 january 2024: आज १८ जानेवारी २०२४ गुरुवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज गुरुवार रोजी, चंद्र मेष राशीत संक्रमण करणार आहे तर शुक्र हा धनु या गुरूच्या राशीत प्रवेश करणार आहे. कर्क, सिंह व कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

कर्कः 

आज चंद्रबल लाभणारं असल्याने मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

सिंहः 

आज चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग अनुकुल दिवसभर मन प्रसन्न राहिल. नोकरीतील बदल फायदेशीर ठरणार आहे. लेखनाचा नवा बाज निर्माण करता येईल. बऱ्याच जणांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. तुमच्या अंगच्या गुणाना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्या साठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०५, ०७.

कन्याः 

आज ग्रहयोग प्रतिकुल आहेत. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसान कारक ठरतील. अल्प फायदा पाहून अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक नुकसान फसवणुक होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner