Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज रविवारी चंद्र वृषभ राशीत भ्रमण करेल. तैतील करणात कर्क, सिंह व कन्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!
आज अनिष्ट ग्रहमान असल्याने वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. खर्चाचा आकडा थोड़ा वाढल्यामुळे तसे वाटणे साहजिक असले तरी पैसे मिळणार आहेत. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साही पणा टाळावा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. साथीदारांच्या कामावर लक्ष असु द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे.
शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.
आज चंद्र गोचरात जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावा मुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीन राहुन कामे करावीत. नियम बाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका.
शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.
आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल.व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा.कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.
शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.