मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांना इच्छित नोकरी मिळेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कन्या राशीच्या लोकांना इच्छित नोकरी मिळेल! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Jan 17, 2024 09:06 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 17 january 2024: आज १७ जानेवारी २०२४ बुधवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज बुधवार रोजी, चंद्र शुक्राशी नवमपंचम योग करीत असल्याने दिनमानावर बुध आणि शुक्राचा विशेष प्रभाव राहील! कर्क, सिंह व कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

कर्कः 

आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुमच्या अंगच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०९.

सिंहः 

आज शिव योगात प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अपेक्षित कार्य पूर्ण करण्या साठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०९.

कन्याः 

आज शुक्र आणि चंद्र याचा योग होत असुन चंद्रावर शनिची पुर्ण दृष्टी आहे. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०६, ०८.

WhatsApp channel