Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांसाठी उद्योग व्यापार तेजी राहील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य-kark sinh kanya rashi prediction today 17 february 2024 cancer leo virgo zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांसाठी उद्योग व्यापार तेजी राहील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : कर्क राशीच्या लोकांसाठी उद्योग व्यापार तेजी राहील! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Feb 17, 2024 11:56 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 17 february 2024 : आज १७ फेब्रुवारी २०२४ शनिवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज शनिवारी चंद्र मंगळ-शुक्र-प्लुटोशी नवमपंचम योग करीत असून, कर्क, सिंह व कन्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्कः 

आज लक्ष्मीयोगात आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढा राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. उद्योग व्यापार तेजील राहिल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०७.

सिंहः 

आज चंद्रबल लाभल्याने आपला प्रभाव वाढणार आहे. रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील .सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०३, ०५.

कन्याः 

आज चंद्र अनिष्ट स्थानातून भ्रमण करत आहे. आपण सावधानीपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे. द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक रहाण्याकडे कल राहील. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्यामुळे कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

शुभरंग: पोपटी, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

 

Whats_app_banner