Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना नवीन योजनेतून लाभ! पाहा तिन्ही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना नवीन योजनेतून लाभ! पाहा तिन्ही राशींचे भविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीच्या लोकांना नवीन योजनेतून लाभ! पाहा तिन्ही राशींचे भविष्य

Updated Jan 12, 2024 09:32 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 12 january 2024: शुक्रवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज चंद्र प्लुटोशी संयोग करत सुर्याच्या नक्षत्रातुन गोचर करणार आहे. कर्क,सिंह व कन्या राशीच्या लोकांना दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज चंद्र योग अनिष्ट स्थानात होत असल्याने तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्या साठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. अगदी साधी गोष्टसुद्धा संघर्षा शिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बनवाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ राखा. शक्यतो आज प्रवास टाळावा.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०९.

सिंह: 

आज अनुकूल चंद्र भ्रमणात स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या: 

आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने परदेशगमना साठी अडचणी उद्भवतील. नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner