मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीने खरेदी विक्रीचा व्यवहार टाळा! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : सिंह राशीने खरेदी विक्रीचा व्यवहार टाळा! वाचा तिन्ही राशींचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 12, 2024 10:34 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 12 february 2024 : आज १२ फेब्रुवारी २०२४ सोमवारचा दिवस कसा जाईल? वाचा कर्क, सिंह व कन्या तिन्ही राशींचं भविष्य.

Cancer, Leo, Virgo
Cancer, Leo, Virgo

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज सोमवारी चंद्र धनु राशीत भ्रमण करणार आहे. दिवसावर शनि आणि गुरूचा प्रभाव राहील. कसा राहील कर्क, सिंह व कन्या राशीसाठी आजचा सोमवारचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कर्क: 

आज गुरू व शनी यांच्याशी होणाऱ्या योगात आर्थिक स्थिती बरी असेल पण तरीही काही गोष्टींबाबत निरीच्छ राहाल. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजू बाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०२, ०४.

सिंह: 

आज ग्रहमान प्रतिकुल असल्याने घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी विचार न करता गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.

शुभरंगः लालसर, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

कन्या: 

आज ग्रहण योगात आर्थिक बाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागले तरी पैसे मिळणार आहेत. कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. वैवाहिक तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळेच उत्साही आणि आनंदी लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल.

शुभरंगः हिरवा, शुभदिशा: उत्तर, शुभअंकः ०३, ०९.