Kark Sinh Kanya Rashi Prediction : वाहन खरेदीचे शुभ योग, पाहा तिन्ही राशीचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Rashi Prediction : वाहन खरेदीचे शुभ योग, पाहा तिन्ही राशीचे भविष्य

Kark Sinh Kanya Rashi Prediction : वाहन खरेदीचे शुभ योग, पाहा तिन्ही राशीचे भविष्य

Jan 01, 2024 09:23 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 1 january 2024: कर्क, सिंह व कन्या राशीवाल्यांचा नववर्षाचा पहिला दिवस कसा जाईल? वाचा तिन्ही राशींचं भविष्य

kark sinh kanya rashi
kark sinh kanya rashi

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya today : आज चंद्राचे सिंह राशीत आणि मघा नंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात गोचर राहील. वाचा कर्क,सिंह व कन्या राशीचे आजचे भविष्य!

कर्कः 

आज लाभदायी ग्रहयोग आहेत. अत्यंत लाभ दायक दिनमान असेल. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. तुमच्यासमोर शत्रूचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. गृहस्थी सौख्य लाभेल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. रोजगारात मात्र प्रतिस्पर्धी डोईजड होतील. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

शुभरंग: गुलाबी. शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०५, ०८.

सिंह: 

आज स्वराशीतील होणारा चंद्राशी योग पाहता नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी कोणताही निर्णय न घेता जैसे थे परिस्थिती ठेवा. नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा. आर्थिक लाभ मिळतील त्यासाठी संबंधीत व्यक्तींशी संपर्क साधल्यास कामे मार्गी लागतील. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्तीबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी होतील. त्यातून फायद्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभ होतील.

शुभरंग: लालसर, शुभदिशा: पूर्व, शुभअंकः ०४, ०६.

कन्याः 

आज रवि-मंगळ युतीत पराक्रम स्थानात होत आहे. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहेच्छूना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आंनदी वातावरण राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. परदेशभ्रमणाचे योग आहेत.

शुभरंगः पोपटी, शुभदिशाः हिरवा, शुभअंकः ०३, ०९.

 

Whats_app_banner