मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Kark Sinh Kanya Horoscope Today : सिंह राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, काळजी घ्यावी लागेल!

Kark Sinh Kanya Horoscope Today : सिंह राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, काळजी घ्यावी लागेल!

HT Marathi Desk HT Marathi
Jan 20, 2024 11:39 AM IST

Cancer, Leo, Virgo rashi prediction today 20 january 2024 : कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य

Kark Sinh Kanya Rashi Bhavishya Today
Kark Sinh Kanya Rashi Bhavishya Today

 

कर्क (Cancer Zodiac)

चंद्र आज मंगळाच्या राशी नक्षत्रातून गोचर करत आहे. व्यावसायिकांना आजचा दिवस अनुकूल आहे. कर्जफेड करण्यासाठी उत्तम दिवस आहे. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. जोडीदारामुळं तुमचा आर्थिक लाभ संभवतो. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्यातील सुप्त गुण प्रकर्षानं उडळून निघतील. विद्यार्थ्यांनी आळस टाळावा. मनासारख्या घटना घडतील असा दिवस आहे. ध्येय गाठण्याच्या दिशेनं निश्चयानं वाटचाल करा. सरकारी नोकरीतील जातकांना प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम राहील, त्यामुळं समाधानी राहाल. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायक कलाकारांना प्रसिद्धीचा योग आहे. मन प्रसन्न व मानसिक आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग: गुलाबी शुभ दिशा: पश्चिम. शुभ अंकः ०६, ०९.

सिंह (Leo Zodiac)

चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत असल्यानं थोडा चिंतेचा काळ आहे. कर्जाची प्रकरणं काळजीपूर्वक हाताळावी लागतील. सारासार विचार करून पाऊल टाका, म्हणजे नैराश्य येण्याची वेळ येणार नाही. घरातील वातावरण काहीसं तणावाचं राहील. धडाडी दाखवाल, परंतु ते करताना अविचारी गोष्टी हातून घडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचं आहे. व्यावसायिकांचं उद्योगधंद्याकडं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. व्यापारात सामंजस्याची भूमिका घ्या. निरर्थक कामात वेळ जाण्याची शक्यता आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. मनस्ताप देणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. शुभ रंगः लालसर शुभ दिशाः पूर्व. शुभ अंकः ०१, ०९.

कन्या (Virgo Zodiac)

शुभ स्थानातील चंद्रभ्रमण आज विशेष लाभदायी ठरेल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहातील. उद्योगधंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मतं बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक तेजीचं वातावरण राहील. सांपत्तिक स्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळं लौकिकता वाढेल. वारसाहकानं मिळणाऱ्या धन व संपत्तीचा लाभ होईल. नवीन योजना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म, पूजापाठ यासारखं धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०६.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

विभाग