ज्योतिषशास्त्रावर बहुतांश लोकांचा विश्वास आहे. शिवाय अनेक लोक नजर लागणे, एखाद्याचा वाईट प्रभाव पडणे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत असतात. त्यामुळेच या गोष्टींपासून बचावासाठी विविध उपाय करत असतात. त्यातीलच एक उपाय म्हणजे हातात किंवा पायात काळा धागा बांधने. बहुतांश लोकांच्या पायात आपल्याला काळा धागा बांधलेला दिसून येतो. मात्र अनेकांना माहिती नाही की, काळा धागा बांधण्याचेसुद्धा काही विशिष्ट नियम असतात. सरसकट सर्वांनी काळा धागा बांधने चुकीचे असते. काळ्या धाग्याचा संबंध थेट शनिदेवाशी आहे. त्यामुळेच सर्वच राशींच्या लोकांसाठी काळा धागा शुभ परिणाम देणारा नसतो. आज आम्ही तुम्हाला काळा धागा बांधने कोणत्या राशींसाठी नुकसानीचे ठरू शकते याबाबत सांगणार आहोत. पाहूया त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांनी पायात काळा धागा बांधने शक्यतो टाळावे. आणि जर बांधलाच तर ज्योतिषांच्या सल्ल्याने बांधावे. कारण काळ्या धाग्याचा संबंध शनिदेव आणि राहू ग्रहाशी आहे. तर मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ आणि शनि घरात शत्रुत्व असते. त्यामुळेच मेष राशीच्या लोकांनी पायात काळा धागा बांधने नुकसानदायक ठरू शकते. असे केल्याने तुमच्या कार्यात अडचणी येऊ शकतात. शिवाय तुमच्या धाडसात आणि पराक्रमात घट होऊ शकते.
काळा धागा बांधने कर्क राशीच्या लोकांसाठीसुद्धा तोट्याचे ठरू शकते. कारण कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आणि चंद्र, शनी आणि राहूमध्ये शत्रुत्व आहे. त्यामुळे काळा धागा कर्क राशीसाठी नुकसानदायक ठरू शकतो. काळा धागा बांधण्याने तुम्हाला मानसिक त्रास जाणवू शकतो. शिवाय शनीचा अशुभ प्रभाव निर्माण झाल्याने कामे रखडतील.
सिंह राशीच्या लोकांनासुद्धा काळा धागा बांधने महागात पडू शकते. कारण सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्यासोबतसुद्धा शनिचे शत्रुत्वाचे संबंध आहेत. आणि काळा धागा शनिदेवाशी संबंधित आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना काळा धागा त्रासदायक ठरू शकतो. असे केल्यास तुमच्या आत्मविश्वासात घट होऊ शकते. नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. शिवाय वडील आणि मुलांमध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सिंह राशीच्या काळा धागा ज्योतिषीय सल्ल्याने बांधने योग्य ठरेल.
इतर ३ राशींप्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठीसुद्धा काळा धागा बांधने नुकसानदायक ठरू शकते. कारण मेष राशीप्रमाणेच वृश्चिक राशीचा स्वामी ग्रहसुद्धा मंगळ आहे. मंगळ आणि शनिमध्ये शत्रुत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे शनिदेवाशी संबंधित असलेला काळा धागा तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. काळा धागा बांधल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. शिवाय इतर अडचणीसुद्धा उद्भवतील. त्यामुळे शक्यतो तुम्ही हे करणे टाळावे.
संबंधित बातम्या