Chandra Bhraman: ग्रह-नक्षत्र या खगोलशास्त्रातील गोष्टी आहेत. ग्रहांच्या हालचाली खगोलीय क्षेत्रात प्रभाव टाकत असतात. मात्र दुसरीकडे ग्रह-नक्षत्रांना ज्योतिषीय महत्वसुद्धा लाभले आहे. ज्योतिष अभ्यासानुसार, ग्रह मानवी आयुष्यावर थेट प्रभाव टाकत असतात. ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. यालाच ग्रहांचे गोचर असे म्हटले जाते. ग्रहांच्या हालचालींमधून विविध योग घटित होत असतात. हे योग राशीचक्रातील बाराही राशींवर चांगले-वाईट परिणाम करत असतात.
उद्या, रविवार ११ ऑगस्ट रोजी चंद्र शुक्राच्या राशीत अर्थातच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच उद्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी रवियोग, द्विपुष्कर योग, शुभ योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींना उद्याच्या या शुभ योगाचा प्रचंड फायदा मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया.
द्विपुष्कर योगाचा फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. याकाळात तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. नोकरीत बदल हवा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. जमीन खरेदी विक्री किंवा विविध स्थावर मालमत्तेच्या संबंधित अडचणी दूर होतील. तुमच्या घरातील भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखाल. त्यात यशसुद्धा मिळेल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.
द्विपुष्कर योगाचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. उद्या, धनु राशीचे लोक त्यांच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही कागदपत्रे पूर्ण करतील. जोडीदारासह काही नातेवाईकांना भेट देण्याची संधी मिळेल. जिथे तुमचा चांगला पाहुणचार होईल. तुमचा व्यवसाय अधिक उंचीवर नेण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत कराल आणि नवीन धोरणे बनवाल. ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. तुमची लव्ह लाईफ बहरेल. रिलेशनशमध्ये असणारे लोक उद्या भविष्यातील योजनांवर चर्चा करतील आणि लग्नाचा निर्णय घेण्याचीही शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांना द्विपुष्कर योग आणि रवि योग अत्यंत फलदायी ठरणार आहेत. याकाळात विविध मार्गाने धनलाभ होईल.आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदारासोबत एखाद्या शुभ कार्यात सहभाग घ्याल. त्याठिकाणी तुमच्या क्षेत्रातील प्रभावित व्यक्तींची भेट होईल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. त्यांच्याकडून महत्वाची माहिती समजेल. करिअरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील. त्यामुळे प्रकृती उत्तम राहील. उद्योग-व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल.