Jyeshtha Purnima 2024: हिंदू धर्मात विविध सण साजरे केले जातात. शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात एखादा तरी सण निश्चितच असतो. या प्रत्येक सणाला एक विशिष्ट महत्व आहे. तसेच प्रत्येक सणामागे एक विशिष्ट महत्व आणि मान्यतासुद्धा असते. त्यानुसार हिंदू धर्मात ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष महत्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो.
ज्येष्ठ पौर्णिमेच्या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रुपात असतो. वैदिक शास्त्रानुसार यादिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. तसेच घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी गंगा स्नान, गरिबांना दान, सत्यनारायण व्रत आणि चंद्राला जल देणे अत्यंत शुभ समजले जाते. यंदाची ज्येष्ठ पौर्णिमा राशीचक्रातील काही राशींसाठी अत्यंत खास असणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा ज्येष्ठ पौर्णिमा २१ जून रोजी सकाळी ६ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जून रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी समाप्त होईल. अशाप्रकारे यावर्षी २१ आणि २२ अशा दोन दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २१ तारखेला ज्येष्ठ पौर्णिमेचा उपवास ठेवला जाईल. तर दुसऱ्या दिवशी दानधर्म आणि स्नान केले जाईल. यंदा ज्येष्ठ पौर्णिमेला विविध शुभ योग निर्माण होत आहेत. ज्याचा काही राशींना मोठा फायदा होणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला शुभ लाभ होणाऱ्या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
ज्येष्ठ पौर्णिमेदिवशी घटित होणाऱ्या विविध राजयोगांचा फायदा वृषभ राशीलासुद्धा मिळणार आहे. यादिवशी वडिलांसोबत असणारे मतभेद दूर होऊन प्रेमभावना वाढीस लागेल. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. या यात्रेतून आर्थिक लाभ होईल. शिवाय वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला आर्थिक लाभ होईल. धार्मिक-अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. तुमची लव्ह लाईफ आणखी बहरेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे. तुमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्यामुळे मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा निर्माण होईल. याकाळात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. धनलाभ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये असलेल्या अडचणी दूर होऊन वेगाने प्रगती होईल. व्यवसायिकांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल.
ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. अचानक धनप्राप्ती होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यापारात गती येईल. महत्वाची रेंगाळलेली कामे पूर्णत्वास जातील. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन नात्यात आणखी दृढता येईल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसन्मान वाढेल. मनावरचा ताण नाहीसा होऊन मनःशांती लाभेल.
संबंधित बातम्या