ज्योतिष शास्त्रात मनुष्याच्या प्रत्येक अडचणींवर कारणे आणि उपाय सांगितले आहेत. शास्त्रामध्ये मनुष्याच्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ग्रह-नक्षत्रांना जोडून पाहिले जाते. वैदिक शास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात विविध बदल झालेले पाहायला मिळतात. नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या समस्येंबाबतसुद्धा शास्त्रामध्ये उपाय आणि कारणे सांगण्यात आली आहेत. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
आजच्या युगात जवळपास सर्वच लोक नोकरी-व्यवसाय करत असतात. त्यामुळे प्रत्येकांमध्ये दुसऱ्यापेक्षा सरस ठरण्यासाठी स्पर्धा सुरु असते. अशात अनेकजण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विविध टार्गेट ठरवत असतात. काहींचे टार्गेट सहजरित्या पूर्ण होतात. तर काहींना अतोनात कष्ट करुनदेखील टार्गेटपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. सततच्या अपयशाने अनेक लोक खचून जातात. मात्र ज्योतिषशास्त्रात याबाबत सांगण्यात आले आहे की, कष्ट आणि प्रयत्न करुनसुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही नाही तुमच्या कुंडलीतील ग्रह कारणीभूत असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकत असतात. ग्रहांच्या हालचालींमुळे माणसाच्या वैवाहिक, व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक, करिअर, प्रेम जीवन अशा सर्वच बाजू प्रभावित होतात. शास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीतील ग्रह मजबूत आणि शुभ असतील तर तुमच्या आयुष्यावर त्यांचा सकारात्मक आणि शुभ प्रभाव पडतो. परंतु ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह कमजोर आणि अशुभ स्थानात असतील त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात विविध मार्गाने अडचणी यायला सुरुवात होते. सतत प्रयत्न करुनही प्रत्येक गोष्टीत अपयश हाती लागते. तर नोकरी-व्यवसायात अडचणींसाठी कोणता ग्रह कारणीभूत आहे ते आपण जाणून घेऊया.
वैदिक शास्त्रानुसार नऊ ग्रहांपैकी गुरु ग्रहाला सर्वात जास्त शुभ ग्रह समजला जातो. त्यामुळेच गुरुला सत्वगुणी ग्रहसुद्धा म्हटले जाते. गुरु विवेक, बुद्धी, ज्ञान, प्रगती यांना कारक असतो. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु शुभ स्थानात असेल, त्यांना प्रचंड लाभ मिळतो. ज्योतिष अभ्यासानुसार उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात गुरुची महत्वाची भूमिका असते. कुंडलीतील दहावे घर उदरनिर्वाहाचे स्थान आहे. त्यामुळे गुरु जर तुमच्या कुंडलीत दहाव्या घरात असेल किंवा स्वराशी, मित्रराशीत असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम करा तुम्हाला फायदाच-फायदा जाणवेल. कार्यक्षेत्रात तुमची वेगाने प्रगती होईल.
परंतु गुरु जर अशुभ स्थानात असेल तर तुम्हाला कार्यक्षेत्रात, व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी ज्योतिषांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य ते उपाय केले पाहिजेत. शिवाय गुरुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी देवगुरु बृहस्पतीची आराधना केली पाहिजे. यामुळे गुरुचा अशुभ प्रभाव कमी होतो. आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागते.
त्यानुसार मंगळ ग्रहसुद्धा नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी कारणीभूत असतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य, उर्जा आणि शौर्याचा कारक मानला जातो. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ असेल तर त्यांना कार्येक्षत्रात अपयश सहन करावा लागतो.
संबंधित बातम्या