Janmashtami special 2024 : दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यास श्रीकृष्ण जन्माष्टमी असंही म्हणतात. साधारणपणे हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी गृहस्थी आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव संप्रदायाचे लोक जन्माष्टमी साजरी करतात.
या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रात १२ राशींचं वर्णन करण्यात आलं आहे. प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या देवतेची विशेष कृपा असते. जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाच्या लाडक्या राशींबद्दल…
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ ही भगवान श्रीकृष्णाची आवडती रास आहे. असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या कृपेनं या राशीच्या लोकांची प्रगती होते आणि त्यांना भरघोस यश मिळतं. या राशीचे लोक कठीण परिस्थितीही अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळतात.
कर्क राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची कृपा असते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक जे श्रीकृष्णाची नियमित पूजा करतात, त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही.
भगवान श्रीकृष्ण सिंह राशीवर खूप प्रेम करतात. या राशीचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. कृष्णाची नियमित पूजा केल्यानं या राशीच्या लोकांना कार्यात यश मिळतं. बिघडलेली कामंही सुरळीत होतात, असं मानलं जातं.
तूळ राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची कृपा असते. ही श्रीकृष्णाची आवडती रास आहे. कृष्णाची पूजाअर्चा केल्यामुळं या राशीच्या लोकांना शुभ फळ प्राप्त होतं, असं मानलं जातं.
हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता. हिंदू धर्मग्रंथांनुसार भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार मानले जातात. जन्माष्टमीच्या दिवशी कंसाच्या अत्याचारांपासून लोकांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंचा कृष्ण रूपात जन्म झाला होता.