श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. जन्माष्टमीचा सण १८ ऑगस्टला साजरा होईल, असे काही ज्योतिषींचे मत आहे, तर काहींचे म्हणणे आहे की, जन्माष्टमीचा सण अष्टमी तिथीच्या आठव्या मुहूर्तावर, म्हणजेच १९ ऑगस्टला असेल. यावर्षी भगवान श्रीकृष्णाची ५२५० वी जयंती साजरी होणार आहे.
अष्टमी तिथी
१८ ऑगस्ट रोजी सप्तमी तिथी रात्री ९ वाजून २० मिनिटांपर्यंत राहील. यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल, जी १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत चालेल.
जन्माष्टमीचा सण मध्यरात्री साजरा केला जातो
अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. अशा स्थितीत जन्माष्टमीचा सण १८ ऑगस्टच्या रात्री साजरा करावा. १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अष्टमी तिथीच्या आठव्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे अनेकांचे मत आहे.
जन्माष्टमीचा सण कधी साजरा होणार
शास्त्रानुसार हिंदू धर्मात कोणताही सण उदय तिथीला साजरा करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत काही लोक १८ ऑगस्टला तर काही लोक १९ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील. पारण जन्माष्टमीचे व्रत १९ ऑगस्टच्या रात्री १०.५९ मिनिटांनीच करावे.
जन्माष्टमी शुभ मुहूर्त २०२२-
अष्टमी तिथी सुरूवात १८ ऑगस्ट २०२२ रात्री ९ वाजून २० मिनिटं
अष्टमी तिथी संपणार १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १० वाजून ५९ मिनिटं
रोहिणी नक्षत्राची सुरुवात २० ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे १ वाजून ५३ मिनिटं
रोहिणी नक्षत्र संपणार २१ ऑगस्ट २०२२ पहाटे ४ वाजून ४० मिनिटं
१८ आणि १९ ऑगस्टच्या मुहूर्ताची पूजा करा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2022 रोजी कृष्ण जन्माष्टमी
निशिता पूजेच्या वेळा १९ ऑगस्ट पहाटे १२ वाजून ३ मिनिटं ते १२ वाजून ४७ मिनिटं
कालावधी ४४ मिनिटे
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२ रोजी कृष्ण जन्माष्टमी
निशिता पूजेच्या वेळा २० ऑगस्ट २०२२ पहाटे १२ वाजून ३ मिनिटं ते १२ वाजून ४७ मिनिटं
कालावधी ४४ मिनिटे
संबंधित बातम्या