Vastu Shastra : या गोष्टी हातातून खाली पडणं मानलं जातं अशुभ
Vastu Tips For Kitchen : आपण दूध तापवलं आणि ते दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याच्या घाईत ते दूध आपल्या हातून सांडतं आणि मग ते सांडलेलं दूध साफ करणं हे आणखी एक काम आपल्यासाठी होऊन बसतं. वास्तुशास्त्रातही घाई संकटात नेई असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
अनेका सकाळी ऑफिसला जाण्याची किंवा एखाद्या ल्गनसमारंभाला हजेरी लावण्याची घाई पाहायला मिळते. मग सगळी कामं अत्यंत घाईत आपण करतो. अनेकदा ही कामं पूर्ण होतातही मात्र अनेकदा याच घाईमुळे आपलं काम दुप्पट होतं. उदाहरणार्थ आपण दूध तापवलं आणि ते दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याच्या घाईत ते दूध आपल्या हातून सांडतं आणि मग ते सांडलेलं दूध साफ करणं हे आणखी एक काम आपल्यासाठी होऊन बसतं. वास्तुशास्त्रातही घाई संकटात नेई असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
वास्तुशास्त्रात काही गोष्टी आपल्या हातून खाली पडणं हे अशुभ संकेत देतात असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. या काही गोष्टी ज्या आपल्या हातून खाली पडल्या तर अत्यंत नकारात्मक संकेत मिळू शकतात किंवा त्या खाली पडलं अशुभ मानलं जातं.
वास्तुशासास्त्रानुसार कोणत्या गोष्टी हातून खाली पडणं मानलं जातं अशुभ?
मीठ
अगदी रोजच्या वापरातली ही वस्तू. मीठ नाही तर जेवण अळणी इतकं त्या मिठाचं महत्व. मात्र हेच मीठ तुमच्या नशीबाशीही जोडलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतिनिधी मानलं जातं. हातातून मीठ पडल्यास ते अशुभ लक्षण आहे. याचा अर्थ म्हणजे आयुष्यात संकटे येणार आहेत.
तेल
वास्तुशास्त्रात तेल हातून पडणे हे अशुभ लक्षण आहे. तेल हे शनिदेवाचे प्रतिक आहे असं सांगितलं जातं. म्हणूनच हातातून वारंवार तेल पडणे हे धनहानीचे लक्षण समजलं जातं.
अन्न
असे म्हटले आहे की जेवताना किंवा सर्व्ह करताना अन्न सांडणे हे अत्यंत अशुभ आहे. जेवण वाढताना हातून अन्नपदार्थ खाली पडणं म्हणजे माता अन्नपूर्णेचा अपमान केल्यासारखं आहे. हातून अन्न खाली पडल्यास घरात गरीबी येणार असल्याचं हे लक्षण आहे.
काळी मिरी
हातातून काळी मिरी विखुरणे किंवा पडणे हे अशुभ लक्षण आहे. काळी मिरी हातातून खाली पडली तर त्याने नात्यात दुरावा येतो, असं सांगितलं जातं. हातातून मिरची पडणं नकारात्मकतेला प्रोत्साहन देतं.
दूध
रंग पांढरा असल्याने याचा संबंध थेट चंद्राशी दर्शवला जातो. गॅसवर उकणारं दूध उतू गेल्यास किंवा हातातून दुधाचा ग्लास सटकल्यास ते शुभ मानलं जात नाही. असं म्हटलं जातं की दुधाची गळती आर्थिक संकट दर्शवते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
विभाग