मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : धनवान व्यक्तींच्या हातात असतो 'भद्रा योग'

Palmistry : धनवान व्यक्तींच्या हातात असतो 'भद्रा योग'

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 07, 2023 03:05 PM IST

Importance Of Bhadra Yog : एखादा मोठा उद्योगपती कसा बनतो, एखाद्याच्या आयुष्यात खूप पैसा कुठून येतो अशा साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे. ते म्हणजे या माणसांच्या हातात असलेला भद्रा योग.

हस्तरेषा शास्त्र
हस्तरेषा शास्त्र (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Bhadra Yog

माणसाच्या हातावरच्या हस्तरेषा त्या व्यक्तीचं आयुष्य कशा प्रकारे व्यतीत होणार आहे याची कल्पना देतात. एखादा मोठा उद्योगपती कसा बनतो, एखाद्याच्या आयुष्यात खूप पैसा कुठून येतो अशा साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे. ते म्हणजे या माणसांच्या हातात असलेला भद्रा योग. हा भद्रा योग नक्की आहे तरी काय चला याची माहिती घेऊया.

कसा बनतो भद्रा योग

हस्तरेषा शास्त्रानुसार, बुध पर्वत पूर्णपणे विकसित असावा. यासोबतच जर बुध रेषा सरळ, पातळ, खोल आणि लालसर असेल तर त्या व्यक्तीच्या हातात भद्रा योग तयार होतो.

हाती शश योग असल्यास

ज्या व्यक्तीच्या हातात शश योग असतो, असे लोक देखील व्यापारी असतात. हे लोक बुध ग्रहाशी संबंधित व्यवसायात चांगले नाव कमावतात. हे लोक धाडसी आणि निर्भयही असतात. यासोबतच शत्रूही त्यांच्यासमोर टिकत नाहीत. शत्रूलाही मित्र बनवण्याची कला या व्यक्तीला चांगलीच अवगत असते.

हातावरच्या बुध पर्वतावर मत्स्य असल्यास

जर बुध पर्वतावर माशाचे चिन्ह असेल तर अशा व्यक्तीला व्यवसायात भरपूर यश मिळते. असा माणूस मोठा उद्योगपती होतो. अशा लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते आणि अशा लोकांना व्यवसायात पत्नीचे पूर्ण सहकार्य मिळते. तसेच, या लोकांना लक्झरी लाइफ जगणे आवडते आणि हे लोक अजिबात कंजूष नसतात.

हाती भद्रा योग असणाऱ्या व्यक्ती कशा असतात

हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातात भद्रा योग असतो. असे योग दूरदर्शी आणि बुद्धिमान असतात. तसेच या लोकांच्या संपर्कात येणारी व्यक्ती. त्याला मदत करायला सदैव तत्पर. हे लोक क्लिष्ट ते किचकट काम सहज करतात. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च स्थान मिळते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग