How will 2025 Go For Farmers: भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे बळीराजा सुखी असेल तर देश सुखी असे म्हणतात. ज्योतिषीय नजरेतून जाणून घेऊ या नवे वर्ष २०२५ शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या शेतीसाठी, पिकपाण्यासाठी कसे जाईल.
या वर्षी शेतीवर तुमचा अधिक खर्च होणार आहे. खतपाणी आणि भांगलन यासाठी पैसा खर्च करावा लागेल. बागाईत पिके चांगली येतील. गळीताची धान्ये, भात, ज्वारी, मिरची ही पिके देखील ठीक येतील. ऊस आणि हळद या पिकांमध्ये फायदा होईल. चालू वर्ष थोडे त्रासाचेच जाईल.
जनावरांचा पसारा वाढवू नका. थोडी बागाईत फायदेशीर ठरेल. मात्र, ती वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. रब्बीची पिके चांगली येतील. आकस्मित पिक धोक्यात येईल. द्राक्षे, कापूस, हळद, तंबाखू या पिकांपासून धोका संभवतो.
सल्ला घेऊन जमिनीत वाढ करावी. बागायतीत लक्ष घालावे. फळफळावळ, रताळी, कांदा, बटाटा यांमध्ये फायदा होईल असे दिसते. किडीपासून संरक्षण करावे लागेल. हरभरा, मिरची, शेंग, तंबाखू या पिकांमध्ये नुकसान होईल. कडधान्याची लागवड करा, यात फायदा होईल.
बागाईत करा, पण थोडी. कांदा, बटाटा, भाजीपाल्याची लागवड करा. कारण ही फायद्याची ठरेल. गळिताची धान्ये, भुईमूग, गहू, हरभरा, भात ही पिके चांगली येतील. काळी आणि पिवळी जमीन फायद्याची ठरेल.
बागाईत करावी. ऊस, गळिताची धान्ये, गहू या पिकांमध्ये फायदा होईल. मिरची, कापूस, तंबाखू, रताळी यांमध्ये नुकसान संभवते. ज्वारी, बाजरी, मका, तूर, हरभरा या पिकांमध्ये फायदा होईल. विहीर खोदणे, पंप बसविणे ही कामे त्रासाने होतील. भाऊबंदकीत तंटे उद्वतील.
हातच्या पिकात नुकसान होण्याचा धोका आहे. बागाईत करा, पण आटोपशीर. शेंग, भात, करडी, ज्वारी, गळिताची धान्ये, मिरची, तंबाखू यांत नफा होईल. जास्त कर्ज काढू नये. नवी जनावरे घेऊ नका. अनाठाई खर्चही होईल.
हे वर्ष प्रगतीचे जाईल. बागाईत करा. विहीर आणि पंपासाठी गुंतवणूक फायदेशीर होईल. पण खर्चाचे प्रमाण वाढेल. गळिताची धान्ये, ऊस, गहू या पिकांमध्ये फायदा होईल. तंबाखू, कापूसमध्ये नुकसान संभवते. ज्वारी, भात, मका, खपली, भाजीपाला चांगला होईल.
नव्या वर्षात शेतीत फायदा होईल. बागाईत करताना खूप कष्ट सोसावे लागणार आहेत. मानसिक त्रासात वाढ होईल. आरोग्याच्या समस्याही उद्भवतील. विड्याची पाने, कांदा, बटाटा, रताळी या पिकांमध्ये विशेष फायदा होणार नाही. ऊस, कडधान्ये, खपली, भात या पिकांमध्ये फायदा होईल.
कांदा, रताळे, बटाटे या पिकांमध्ये फायदा होईल. तंबाखू, मिरची, हळद या पिकांमध्ये अचानक फायदा होईल किंवा एकतर नुकसान होईल असे दिसते. कापसाच्या किडीपासून नुकसान हाईल. एकंदरीत नवे वर्ष बरे जाईल असे दिसते. शेतीत बदल करायचा झाल्यास जाणकारांचा सल्ला जरूर घ्या.
रब्बी पिके चांगली येतील. विड्याची पाने मात्र धोका देतील. प्रमाणाच्या बाहेर जनावरे खरेदी करू नका. बागायतीपासून फायदा होईल. कांदा, बटाटा, रताळी, द्राक्षे, पेरू आणि भाजीपाल्याची लागवड फायदेशीर ठरेल. नेहमीच्या पिकांमध्ये बदल करू नका.
नदीबूड रानात पिके चांगली येतील. मोठी कर्जे काढू नका. जिराईत पिके चांगली येतील. मका, शेंग, केळी, लिंबू, रताळी, वांगी आणि भाजीपाल्याचे पीक यामध्ये चांगला फायदा होईल.
पिकामध्ये बदल करू नका, केल्यास फार कष्ट पडतील. कष्टाची तयारी असेल तर बदल करावा. मात्र तसे केले तरी थोडक्यात समाधान मानावे लागेल. नदीबूड रानास धोका संभवतो. पाणस्थ तांबडी माती चांगली पिकेल. जिराईत पिके फायद्याची आहेत. शेंग, रताळी, मिरची, बटाटा चांगली येणार नाहीत. किडीपासून धोका आहे. ज्वारी, बाजरी, मका, तूर ही पिके बरी येतील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या