Shani Upay News : शनी हा अत्यंत कठोर ग्रह मानला जातो. त्याचा कोप होऊ नये, त्याची वक्रदृष्टी पडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. शनीची साडेसाती एकदा लागली की ती पाठ सोडत नाही. अनेक संकटांना सामोरं जावं लागतं असं म्हणतात. याउलट शनी प्रसन्न असेल तर सगळं सुरळीत चालतं. त्यामुळं शनीदेवाला खूष ठेवण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे.
शनिवारचा वार शनिदेवाचा असतो. या दिवशी किंवा अन्य दिवशी काही खास उपाय करून शनिदेवाला प्रसन्न ठेवता येतं. साडेसतीचा प्रभावही कमी करता येतो. जाणून घेऊया शनि ग्रहाची कृपादृष्टी कायम राखण्याचे १० उपाय…
शनिवारी ७ वेळा शनि स्तोत्राचं पठण करा.
शनिदेवाची कृपादृष्टी राहण्यासाठी पक्षी, मासे आणि प्राण्यांना धान्य, पाणी किंवा चारा खाऊ घाला.
शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमानाची पूजा करा. रोज हनुमान चालिसाचं पठण केल्यानं शनिदेवाचा कोप होत नाही.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
साडेसाती किंवा ढय्याच्या काळात मांस किंवा मद्य सेवन करू नका. शनिवारी तामसिक पदार्थाचं सेवन टाळा.
शनि ग्रह मजबूत करण्यासाठी, नोकरदार आणि वृद्ध लोकांचा आदर करा. अशा लोकांशी गैरवर्तन करू नका किंवा त्यांना दुखवू नका.
मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ मिसळून शनि मंदिरात प्रज्वलित केल्यानं शनीची कृपा होते.
शनिवारच्या दिवशी काळे तीळ, काळे कपडे, इस्त्री किंवा काळी उडीद डाळ दान करणं शुभ मानलं जातं. यामुळं शनिही प्रसन्न होतो.
भक्तीभावानं शनि मंत्र ओम शं शनिश्चराय नमः चा जप करा.
गरिबांना अन्नदान करून किंवा मदत करूनही शनिदेवाचा प्रसन्न ठेवता येतं.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती धार्मिक रुढी-परंपरा व ज्योतिषशास्त्रावर आधारीत आहे. ही माहिती पूर्णपणे अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या