Ahoi Ashtami 2024: कधी आहे अहोई अष्टमी? आपल्या राशीनुसार असे करा पूजन
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ahoi Ashtami 2024: कधी आहे अहोई अष्टमी? आपल्या राशीनुसार असे करा पूजन

Ahoi Ashtami 2024: कधी आहे अहोई अष्टमी? आपल्या राशीनुसार असे करा पूजन

Updated Oct 22, 2024 11:00 AM IST

Ahoi Ashtami pujan 2024: अहोई अष्टमीचे व्रत हे आपल्या अपत्यांच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच मंगलकामनेसाठी केले जाते. ज्या प्रमाणे स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करतात, तसेच अहोई अष्टमीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते.

अहोई अष्टमी पूजन
अहोई अष्टमी पूजन

हिंदू धर्मात कार्तिक महिन्यात करवा चौथनंतर चौथ्या दिवशी, म्हणजेच कार्तिक कृष्ण अष्टमीला आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, तसेच त्याच्यावरील सर्व संकटे दूर व्हावीत, सर्व विघ्ने टळावीत यासाठी अहोईमातेचे व्रत केले जाते. हे व्रत अहोई अष्टमीच्या नावाने केले जाते. अहोई अष्टमीच्या दिवशी व्रत घेतलेल्या महिला पूजनाह आपल्या राशीनुसार उपाय करतात. अहोई अष्टमीला व्रत करून पार्वतीमातेचे पूजन केल्यामुळे शुभफलात वृद्धी होते, तसेच व्रती महिलांच्या मुलांचे कल्याण होऊन त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. 

कसे करावे अहोई अष्टमीचे व्रत आणि या व्रतासाठी व्रती महिलांनी  कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहू या...

 

अहोई अष्टमीला राशीनुसार करावयाचे उपाय

 

मेष

व्रत धारण केलेल्या मेष राशीच्या महिलांनी पार्वतीमातेला भक्तिभावाने कुंकू अर्पण करावे.

वृषभ

वृषभ राशीच्या महिलांनी शिव-पार्वतीला पांढरे चंदन अर्पण करावे. यामुळे व्रती महिलेला अतिशुभ फलप्राप्ती होते.

मिथुन

मिथुन राशीच्या महिलांनी पार्वतीमातेला द्रव्य-दक्षिणा अर्पण करावी. असे केल्याने व्रती महिलेस पार्वतीमातेचा आशीर्वाद लाभतो.

कर्क

कर्क राशीच्या महिलांनी या दिवशी अहोईपुढे फळाचा भोग चढवावा

सिंह

सिंह राशीच्या महिलांनी व्रतादरम्यान भगवान शिवाच्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

कन्या

कन्या राशीच्या महिलांनी पार्वतीमातेला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी

तुळ

तुळ राशीच्या महिलांनी तथाशक्ती शृंगाराच्या वस्तूंनी पार्वतीमातेचा श्रृंगार करावा

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या महिलांनी अहोई अष्टमीच्या दिवशी व्रताचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी व्रतकथा श्रवण करावी, तसेच ती इतर महिलांना ऐकवावी.

धनु

धनु राशीच्या महिलांनी व्रतादरम्यान भगवान शिवाचा मंत्र 'ओम् नम: शिवाय' याचा जप करावा.

मकर

मकर राशीच्या महिलांनी पार्वतीमातेला घरात तयार केलेले गोडधोड किंवा खीर याचा भोग अर्पण करावा.

कुंभ

कुंभ राशीच्या महिलांनी पार्वतीमातेच्या चरणांवर आलता अर्पण करावे

मीन

मीन राशीच्या महिलांनी पार्वतीमातेला सिंदूर अर्पण करावा आणि आपल्या भांगात कुंकू लावून घ्यावे.

 

 

माता अहोई

अहोई मातेला पार्वतीचे रूप मानले जाते. मुलांचे रक्षण करणारी आणि त्यांना दीर्घायुष्य देणारी देवी म्हणून अहोईमातेची म्हणजेच पार्वतीची पूजा केली जाते. अहोईमातेची पूजा केल्याने स्त्रियांच्या कुंडलीत काही योग तयार होतात. या योगांमुळे बंधन योग, गर्भपातापासून मुक्ती, अपत्यांचा अकाली मृत्यू, दुष्ट मुले इत्यादी सर्व अशुभ योग दूर होतात, अशी मान्यता आहे. 

Whats_app_banner