Family Problems : तुमच्या घरात कलह होत आहेत का?, मग हे उपाय नक्की करून पाहा!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Family Problems : तुमच्या घरात कलह होत आहेत का?, मग हे उपाय नक्की करून पाहा!

Family Problems : तुमच्या घरात कलह होत आहेत का?, मग हे उपाय नक्की करून पाहा!

May 24, 2023 02:56 PM IST

Tips To Overcome Family Problems : एकमेकांवर हक्क दाखवतो आणि वेळप्रसंगी एकमेकांचं रक्षणही करतो. हे असं सुरू असताना अचानक शंभर दु:खांचे धागे येतात आणि मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, रोजची भांडणं सुरू होतात आणि मग घर म्हणजे एक आखाडा बनतो.

घरात भांडणं होत असल्यास काय करावं
घरात भांडणं होत असल्यास काय करावं (हिंदुस्तान टाइम्स)

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खांचे असं एक गाणं आहे. आयुष्यात खरोखरीच एक सुखाचा धागा असतो आणि त्याभोवती आपण आपलं आयुष्य किती समृद्ध करू शकतो याचा सतत प्रयत्न करत असतो. त्यात आपल्या घरातल्या व्यक्तींचाही आपण समावेश करतो. घर ही एक अशी गोष्ट असते जिथे आपली मुलं, आपले आईवडील,आजीआजोबा बिनदिक्कतपणे एकमेकांशी संवाद साधतो. एकमेकांवर हक्क दाखवतो आणि वेळप्रसंगी एकमेकांचं रक्षणही करतो. हे असं सुरू असताना अचानक शंभर दु:खांचे धागे येतात आणि मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, रोजची भांडणं सुरू होतात आणि मग घर म्हणजे एक आखाडा बनतो. मग याच घरगुती कलहांवर उपाय कसा काढावा हे आपण पाहाणार आहोत.

नवग्रहाची पूजा करावी

ग्रह-नक्षत्रांमुळे घरात वाद होत राहतात, त्यामुळे नवग्रहाची पूजा घरात एकदा करावीच. असे केल्याने कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहते आणि कुंडलीत उपस्थित असलेल्या सर्व ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात. यासोबतच कुटुंबातील सदस्यांची प्रगती आणि सौहार्द राहते. नवग्रहाच्या उपासनेमध्ये ज्योतिषीय मार्गदर्शन घ्यावे.

मिठाच्या पाण्याने लादी पुसावी

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमच्या घरात कुटुंबातील सदस्य, पती पत्नी किंवा शेजाऱ्यांसोबत वाद होत असेल तर दररोज सकाळी मिठाच्या पाण्याने घर पुसून टाका. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. यासोबतच घरातील वास्तुदोषही कमी होतात. पण लक्षात ठेवा गुरुवार आणि शुक्रवारी मिठाच्या पाण्याने पुसू नका, असे करणे शुभ मानले जात नाही.

पती-पत्नीत भांडणं होत असतील तर काय करावं?

पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत असेल तर पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी तो जाळून टाकावा आणि नंतर ती राख वाहत्या पाण्यात टाकावी. असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते आणि नातेही घट्ट होते. त्याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज देशी तुपाचा दिवा लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner