Vastu Shastra : वास्तु दोष कसे कराल दूर? घरातल्या कलहावर असा मिळवा विजय
Vastu Tips For Happy Home : अनेकदा त्या घरात प्रवेशही करू नये असं वाटत. मात्र हा दोष कुटुंबातल्या सदस्यांचा नसून त्या वास्तूचा आहे हे जेव्हा ध्यानी येतं तेव्हा वास्तुशास्त्र कामाला येतं.
काही कारणांमुळे काही घरात सतत कलहाचं वातावरण पाहायला मिळतं. घरातले हे कलह अलक्ष्मीला आमंत्रण देतात. घरात सतत कोणीतरी आजारी असतं, काहीतरी दुखणी सुरूच असतात. मग अशा वेळेला अनेकदा त्या घरात प्रवेशही करू नये असं वाटत. मात्र हा दोष कुटुंबातल्या सदस्यांचा नसून त्या वास्तूचा आहे हे जेव्हा ध्यानी येतं तेव्हा वास्तुशास्त्र कामाला येतं. मग घरात सतत कलह होत असल्यास वास्तुशास्त्राच्या कोणत्या पद्धती करून पाहाव्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
गृह कलह होत असल्यास काय सांगतं वास्तुशास्त्र?
घरातील खराब वास्तूमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होत असल्यास घराच्या आग्नेय कोपर्यात म्हणजेच आग्नेय दिशेला मोराची पिसे लावावीत. यामुळे घरातील वास्तू दोष दूर होण्यास मदत होते.
घरातील क्लेश दूर करायचे असल्यास, घरातील क्लेशाने त्रस्त असलेले लोक मोराच्या पिसांसंबंधी उपाय करू शकतात. यासाठी घराच्या मुख्य गेटवर ३ मोराची पिसे लावा. “ओम द्वारपालाय नमः जागराय स्थिराय स्वाहा” या मंत्राचा सतत जप करा. असे मानले जाते की या उपायाने कौटुंबिक कलह दूर होतो आणि वाईट नजरेपासूनही त्या घराचे संरक्षण होते.
शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी, ज्यांना शत्रूंचा त्रास आहे, त्यांनी मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींच्या कपाळावर थोडेसे शेंदूर लावावे. हा शेंदूर मोराच्या पिसाने लावावा आणि उरलेला शेंदूर वाहत्या पाण्यात सोडून द्या. असे मानले जाते की यामुळे जीवनातील शत्रूंचा नाश होतो.
घरात नकारात्मक उर्जा राहिल्याने त्रास, समस्या, रोग इत्यादींचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी घराच्या ईशान्य कोपर्यात श्रीकृष्णाच्या चित्रासोबत मोराची पिसे लावावीत. यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्हमध्ये बदलेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग