आजची आपली जीवनशैली धकाधकीची बनली आहे. आज प्रत्येकाकडे एकमेकांसाठी वेळ नाहीये. धकाधकीच्या जीवनात ताणतणाव हे ठरलेले असतात. मात्र एखाद्याच्या बाबतीत हेच ताणतणाव खूप पटीने जास्त होत जातात आणि मग कधीकधी ही व्यक्ती वैफल्याच्या आहारीही जाऊ शकते.
मात्र तुम्हीही मानसिक ताणतणावाचे शिकार झाला असाल तर रत्नशास्त्रात त्यावर एक उपाय सांगितला आहे. रत्नशास्त्र हे नवग्रहांच्या दोषांच्या शांतीसाठी तयार केलं गेलेलम शास्त्र आहे. यात ज्योतिषांच्या सल्ल्याने तुम्ही एखादं रत्न धारण करून त्याग्रहाचे दोष कमी करू शकता.
मून स्टोन हे असच एक रत्न आहे जे धारण केल्यावर मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. चला तर या रत्नाचे फायदे जाणून घेऊया.
चंद्र दोष दूर करतो मूनस्टोन
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र बलवान बनवायचा असेल तर मूनस्टोन धारण करणे शुभ असते. मूनस्टोनला चंद्राचं रत्नं असेही म्हणतात. हा धारण केल्याने एकीकडे मानसिक तणाव दूर होतो, तर दुसरीकडे व्यक्तीची निर्णयक्षमताही वाढते.
कोणी घालावा मूनस्टोन
ज्या लोकांचा कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, त्यांनी मूनस्टोन धारण करावे. असे लोक वागण्यात खूप संवेदनशील असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही भावूक होतात. मूनस्टोन व्यक्तीची लपलेली सर्जनशीलता बाहेर आणण्यात खूप मदत करते.
मूनस्टोन कसा धारण करावा
मूनस्टोन धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा मानवी शरीराजवळ फिरकत नाही. गंगेच्या पाण्याने आणि गाईच्या दुधाने शुद्ध करून मूनस्टोन भगवान शंकराला अर्पण करावा आणि मगच तो धारण करावा.
कोणत्या दिवशी मूनस्टोन घालणे शुभ आहे?
कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील सोमवारी रात्री हाताच्या सर्वात लहान बोटात मूनस्टोन धारण करावा. यासोबतच हे रत्नं पौर्णिमेच्या दिवशीही घातलं जाऊ शकतं. या दोन दिवसात मूनस्टोन धारण केल्याने शुभ प्रभाव लवकर दिसू लागतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या