मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rajyog : तब्बल १०० वर्षानंतर जुळून येतोय 'मालिका राजयोग'! 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे झळाळणार

Rajyog : तब्बल १०० वर्षानंतर जुळून येतोय 'मालिका राजयोग'! 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे झळाळणार

Jun 25, 2024 09:14 AM IST

मालिका राजयोगाने काही राशींच्या आयुष्यात धनसंपत्ती, सुख, प्रगती आणि मनःशांती लाभणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १०० वर्षाने या मालिका राजयोग जुळून येत आहे.

मालिका राजयोग, ग्रहांचा राशीवर प्रभाव
मालिका राजयोग, ग्रहांचा राशीवर प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित कालावधीत राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. प्रत्येक ग्रहाचा स्थान बदलाचा कालावधी निश्चित असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांतून विविध शुभ-अशुभ ग्रह निर्माण होत असतात. या योगांचा थेट परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होत असतो. वास्तविक ग्रहांच्या हालचालींवरुनच राशींचे भविष्य ठरत असते. त्यामुळे वैदिक शास्त्रात ग्रहांच्या राशीपरिवर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे.

नवग्रहांपैकी सूर्य ग्रहाला एक विशेष महत्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्य बुद्धी, तेज, एकनिष्ठ, एकाग्रता आणि दृढनिश्चय यांचा प्रतीक आहे.

सूर्याच्या या गुणांचा प्रभाव त्याच्याशी संबंधित राशींवरसुद्धा पडत असतो. त्यामुळेच सूर्याचे राशी परिवर्तन खास असते. सूर्याने काही दिवसांपूर्वी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. परंतु याआधीच मिथुन राशीत बुध आणि शुक्र ग्रहानेसुद्धा प्रवेश केला आहे. याशिवाय वृषभ राशीमध्ये गुरु, कन्या राशीत केतू, कुंभ राशीत शनि, मेष राशीत मंगळ आणि मीन राशीत राहू विराजमान आहेत. हे सर्व प्रभावी ग्रह एकाच रेषेत विराजमान असणार आहेत. या ग्रहांच्या एकाच रेषेत विराजमान असण्याने एक मालिका तयार होत आहे. यालाच 'मालिका राजयोग' असे संबोधले जाते. मालिका राजयोगाने काही राशींच्या आयुष्यात धनसंपत्ती, सुख, प्रगती आणि मनःशांती लाभणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १०० वर्षाने या मालिका राजयोग जुळून येत आहे.

मेष

राशीचक्रातील पहिली राशी म्हणजे मेष राशी होय. मेष राशीच्या लोकांना मालिका राजयोगाचा विशेष लाभ मिळणार आहे. याकाळात तुमच्या कमाईत प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. स्वभावातील धाडशीपणा आणि बुद्धिमत्ता दुपट्टीने वाढेल. नोकरदारवर्गाला कामात प्रगती झालेली दिसून येईल. नवीन पद किंवा जबाबदारी पदरात पडेल. महत्वाच्या कामात भावंडाची साथ लाभेल. घरातील वातावरण आनंदी असेल. विदेशात व्यापार असणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. शिवाय व्यवसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी याकाळात मिळेल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचा योग जुळून येत आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना मालिका राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे. कारण बुध, शुक्र आणि सूर्य तुमच्या राशीत लग्न भावात विराजमान असणार आहेत. याकाळात तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल होईल. तुमचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक उठावदार होईल. तुमच्यातील धडाडी वाढेल. शिवाय निर्णय क्षमता अधिक बळकट होईल. त्यातून काही चांगले निर्णय घेतले जातील. मनात योजिलेले कार्य याकाळात पूर्ण होतील. वैवाहिक लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि सुखसमृद्धी वाढेल. एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.

सिंह

मेष आणि मिथुनप्रमाणेच सिंह राशीलासुद्धा मालिका राजयोगाचा फायदा होणार आहे. बुध, गुरु, शुक्रसारखे शक्तिशाली ग्रह एकाच रेषेत आल्याने तुमच्या कमाईत वाढ होऊ शकते. अचानक धनलाभ होऊन आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. उत्पन्नाचे नवे स्तोत्र उपलब्ध होतील. नोकरदार वर्गाला आपली क्षमता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. व्यवसायिकांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आता फायदा होईल. शिवाय याकाळात मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

WhatsApp channel