Shukra Nakshatra Transit: ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, वैभव, संपत्ती आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक मानले गेले आहे. शुक्राच्या गोचराचा मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत, असे सर्वच राशींवर परिणाम होतो. राक्षसांचा गुरू म्हणवला जाणारा शुक्र देखील एका विशिष्ट कालखंडात राशिपरिवर्तनाप्रमाणे नक्षत्र बदलतो. ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरुवारी शुक्र ज्येष्ठा नक्षत्रातून बाहेर पडून मूळ नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार मूळ नक्षत्रावर केतू ग्रहाचे वर्चस्व असते. अशा तऱ्हेने शुक्र केतूच्या नक्षत्र असलेल्या मूळ नक्षत्रात प्रवेश करेल. याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल तर काही राशींवर सामान्य प्रभाव पडेल. शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या ३ राशींवर सकारात्मक परिणाम होईल ते जाणून घेऊ या…
द्रिक पंचांगानुसार शुक्राने ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ०३ वाजून ३९ मिनिटांनी मूळ नक्षत्रात प्रवेश केला आहे. शुक्र १० डिसेंबरपर्यंत मूळ नक्षत्रात राहील आणि त्यानंतर ११ डिसेंबर रोजी पहाटे ०३ वाजून २७ मिनिटांनी शुक्र श्रवण नक्षत्रात गोचर करेल.
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात कौटुंबिक सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने कोणत्याही कामात यश मिळवता येईल. आर्थिक दृष्ट्या तुम्ही चांगली कामगिरी कराल. व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. धनसंचय करण्यासाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
शुक्राच्या नक्षत्र बदलाचा वृषभ राशीवर होणारा परिणाम सकारात्मक असणार आहे. या काळात गुंतवणुकीचे चांगले पर्याय मिळतील. व्यवसायात नफा वाढेल. प्रवासात फायदा होईल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांना वाचन-लेखनाची आवड निर्माण होईल.
शुक्राचे मूळ नक्षत्रातील संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. शुक्र संक्रमणाच्या प्रभावाने आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. भौतिक संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नियोजनानुसार कामे करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी पराभूत होतील. आर्थिक दृष्ट्या चांगला काळ निर्माण होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.