Horoscope Today 9 January 2024: मंगळाची कृपादृष्टी, चढ-उताराचा मंगळवार! वाचा राशीभविष्य!-horoscope today 9 january 2024 daily rashi bhavishya in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 9 January 2024: मंगळाची कृपादृष्टी, चढ-उताराचा मंगळवार! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 9 January 2024: मंगळाची कृपादृष्टी, चढ-उताराचा मंगळवार! वाचा राशीभविष्य!

Jan 09, 2024 08:45 AM IST

Horoscope Today 9 January 2024: आज ९ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope 9 january 2024
Horoscope 9 january 2024

आज मंगळवार ९ जानेवारी रोजी, चंद्र वृश्चिक राशीच संक्रमण करेल. भौमप्रदोष दिनी चंद्र राहु-नेपच्युन बरोबर नवम पंचम योग करणार आहे. दिनमानावर बुधाचा प्रभाव राहील. कोणावर होणार मंगळाची कृपादृष्टी! कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. अडलेली कामे पार पडतील. समयसूचकता दाखवाल. वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करियरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्य आज नक्की पूर्ण करा. नवीन व्यवसायाची सुरवात कराल. स्पर्धा-परिक्षेच्या मुलाखतीमध्ये यश मिळेल. मागील केलेल्या कामात यश मिळेल.

वृषभः 

आज आर्थिक बाबतीत अनेक मार्ग खुले होतील. परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा मात्र टिकणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल. वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील. कलाकारांना योग्य संधी प्राप्त होतील.

मिथुनः 

आजचं तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. चित्रकार व शिल्पकारांना अनेक संधी मिळतील. परदेशगमनाचे योग संभवतात. गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच पण उत्कृष्ट काम करा. पैशाबाबत काटेकोर रहाल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्रातील महिलांना अनुकुल प्रगतीचे शिखर गाठता येईल.

कर्कः 

आज करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह नसेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. दिवस त्रासदायक ठरेल. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. नकारात्मक भावना वाढतील. आळसीवृत्ती टाळावी. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्‌भवतील. अचानक संकट येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. नुकसान सहन करावे लागेल. कामे पुर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नको त्या गोष्टींवर विचार करत बसाल.

सिंहः 

आज वरिष्ठांच्या मर्जीमुळे आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण समाधानकारक असेल. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. व्यापारात आर्थिक लाभ होईल. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकुल दिवस आहे.

कन्याः 

आज ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संततीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ ठेवावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट करावे लागतील. व्यसनांपासून सावध राहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या वस्तूंची काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळस झटकुन कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. 

तूळ: 

आज अत्यंत शुभ दिवस असेल. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त राहण्याचा योग आहे. कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. अनेक गोष्टी बौद्धीक निकषावर घासून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल आणि अधिकार सहजासहजी सोडणार नाही. व्यवसायिकांची आर्थिक प्रगती होईल. लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. कामासाठी दुरचे प्रवास घडतील.

वृश्चिकः 

आज लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. उधारी वसूल होतील. त्यासाठी मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील रखडलेल्या कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वास्तुसंबंधी विचार पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संतती करिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज दीर्घकालीन गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल. आर्थिक वृद्धी होईल.

धनुः 

आज विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक अभ्यास करावा. दाम करी काम असे वातावरण राहील. एखादा निर्णय तडका फडकी घेण्यापासून सावध राहा. वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खर्च वाढतील. मनमानी पणे काम करण्याच्या पद्धतीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे शक्यतो टाळा. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते. फसवणूकीसारखे प्रकार घडतील.

मकरः 

आजचं संततीच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पोचपावती मिळेल. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय चुकीचे घेतले जातील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीचा दिवस आहे. अनुकुल घटना घडतील. नियोजीत कामात वेग येईल. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम राहील. आर्थिक धनलाभ होतील.

कुंभः 

आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्यमुळे उत्साही वातावरण निर्माण होईल. वास्तुविषयी काम सुरुळित पार पडेल. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. जोडीदाराबद्दल प्रेम भावना वाढेल. व्यवहार फायदेशीर ठरतील. आज विशेष फायदा होण्याचे योग आहेत.

मीनः 

आज नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. त्यामुळे मानमरातब आपोआप घर चालत येईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. शब्दांवर प्रभुत्व मिळवलं तर व्यवहारात फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कोर्ट-कचेरीसंबंधी निकाल आपल्या बाजुने लागेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)