महाशिवरात्री आणि प्रदोष दिनी चंद्र स्वतःच्या मालकीच्या नक्षत्रातुन आणि शनिच्या राशीतून भ्रमण करणार आहे. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज प्रवासाचे योग येतील. खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आर्थिक प्रगती होईल. यश निश्चित लाभेल.
आज उत्तम दिवस राहील. उत्पन्नाचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार तेजी राहील. स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.
आज रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. कलाकरांना संधी मिळतील. यश मिळवण्यासाठी जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. निर्णय महत्वपूर्ण व भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील . कामाची प्रशंसा होईल. गाठीभेटी होतील.
आज द्विधा मन:स्थितीमुळे घोटाळा होऊ शकतो. कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. ताणतणाव वाढेल. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
आज लाभदायक दिवस आहे. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगलकार्य घडतील. विद्यार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.
आज यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल.
आज अत्यंत शुभ दिवस असेल. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात प्रपोज करायला उत्तम ग्रहमान आहे. मोठे यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. भावडांशी वादविवाद टाळा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.
आज नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. जोडीदारा बरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होऊ शकते. शक्यतो प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते.
आज सहकार्य लाभेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. आवडी निवडी बदलत राहतील. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील.
आज आपणास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाऊ शकतात. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाचे निर्णय घेऊ नयेत. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा.
आज आंनदाची बातमी मिळेल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. विद्यार्थ्याची प्रगती होईल. मन प्रसन्न असेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. फायदेशीर दिवस राहील.
आज मानसन्मान मिळेल. मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल.
संबंधित बातम्या