मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 8 January 2024: आठवड्याचा पहिला दिवस कामाचा व्याप वाढवेल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 8 January 2024: आठवड्याचा पहिला दिवस कामाचा व्याप वाढवेल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 08, 2024 08:14 AM IST

Horoscope Today 8 January 2024: आज ८ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 8 January 2024
Today horoscope 8 January 2024

आज सोमवार ८ जानेवारी रोजी, अस्त मंगळाचा उदय होणार असून, बुध धनु राशीत प्रवेश करतोय. चंद्र शुक्राशी संयोग करत दिवस रात्र मंगळाच्या राशीतुन आणि अनुराधा नक्षत्रातुन संक्रमण करणार आहे. आजच्या दिवसावर विशेषत: शनिदेव आणी भूमिपुत्र मंगळ, तसेच ऐश्वर्यादायी शुक्राचा प्रभाव राहील, कसा असेल सोमवार? वाचा मेष ते मीन राशीचे भविष्य.

मेष: 

आज अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. मानसिक ताण जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे काळजीत पडाल. मनमानी पद्धतीने काम करू नका. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ घटना ऐकायला मिळेल. सावध राहा. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. वेळेत काम पूर्ण करा. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. स्थावराच्या देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. 

वृषभ: 

आज वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोड करावी लागेल. आर्थिक उलाढाल यशस्वी ठरेल. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची चांगली साथ मिळेल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा मान-सन्मान वाढेल. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. पत्नीकडून कडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.

मिथुन: 

आज आपल्या राशीनुसार अनिष्ट स्थानातून चंद्रगोचर होत असल्याने घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. कामात अपेक्षेनुसार यश मिळणार नाही. व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न व खर्च यात समतोल राखा नाही तर चिंता वाढेल.

कर्क: 

आज कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी करा. दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल, तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळेल. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सहकार्य लाभेल. 

सिंहः 

आज काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळवाल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जीवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्याविषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

कन्या: 

आज अनेक कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाप्रती सजग राहा. आळस दूर ठेवा. उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल.

तूळ: 

आज आळशीपणा कराल. परदेशा संदर्भात कामे रखडतील. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. कष्ट केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत वरिष्ठांच्या विचाराविरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. अपघात भय संभवते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका.

वृश्चिक: 

आजच्या वास्तव परिस्थितीचा विचार अवश्य करावा. घरामध्ये वेगवेगळ्या विचारांमुळे मतभेद होऊ शकतात. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी असतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहील. शासकीय कामकाजाकरिता यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे सांभाळून ठेवा. खर्च वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.

धनु: 

आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबात परस्पर मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांवर लक्ष ठेवा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. वाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळा.

मकर: 

आज आनंदाचे वातावरण असेल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंदा वाढेल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. परंतु नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ: 

आज कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल.

मीनः 

आज नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून कार्यास प्रोत्साहन मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात नावलौकिकता मिळेल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)