आज गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी, शिवरात्री, त्रयोदशीचा चंद्र गुरू आणि शनिच्या राशीतून भ्रमण करणार आहे. अशात काही राशींना आर्थिक लाभ होईल तर काही राशींना आर्थिक व्यवहार टाळावे असा सल्ला दिला आहे. तुमच्यासाठी कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य!
आज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे जातीने लक्ष घालावे लागेल. बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. अध्यात्म प्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानी पूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळावे.
आज भाग्यदायक घटना घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन कराल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. स्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.
आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. लाभासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल.
आज नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. जास्त काम करावे लागेल. स्वभावाचा फायदा होईल. मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. मन प्रसन्न राहील. यशाचा दिवस आहे.
आज मनामध्ये प्रचंड खळबळ अनुभवाल. जवळच्या मित्राच्या भरवशावर लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. तुमचा गोंधळ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेश प्रवास घडेल. मानसिक चिडचिड व दगदग होईल. कायद्याच्या कचाट्यात अडकाल. नुकसान होईल.
आज आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. मनोरंजनाकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आत्मविश्वास उंचावलेला असेल. फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. सहकार्य लाभेल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
आज धडाडीने एखादे काम पूर्ण कराल. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी, प्रस्ताव येतील. आत्मविश्वास द्विगुणित राहील. अनुकुल घटना घडतील. मन प्रसन्न असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येईल. आर्थिक धनलाभ होतील. घाईगडबडीमुळे अडचणही येऊ शकते.
आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. समाजात प्रतिष्ठा मिळेल. उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. देश-विदेशात फिरण्याची संधी येईल. मनावरचा संयम सुटू शकतो. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल.
आज शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. नेहमीपेक्षा घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. वादविवाद होऊ शकतात. प्रेमप्रकरणात त्रास होईल.
आज सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु निराशा पदरात पडेल. पण आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवा. मन अस्थिर राहील पण संधी अवश्य पदरात पाडून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. लाभदायी दिवस असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. खरेदी-विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना उत्तम धार्मिक सत्संग घडेल.
आज घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडणापासून दूर राहा. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. मनाप्रमाणे काहीही घडणार नाही. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे.
आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. मनापासून एखाद्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल. व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. खरेदीचे योग आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.