मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 8 April 2024 : हिंदू वर्षअखेर व सोमवती अमावस्येचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 8 April 2024 : हिंदू वर्षअखेर व सोमवती अमावस्येचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 08, 2024 08:51 AM IST

Horoscope Today 8 April 2024 : आज ८ एप्रिल २०२४ सोमवार रोजी, दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२४
आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२४ (Freepik)

आज सोमवार ८ एप्रिल रोजी, सोमवती अमावस्येचा चंद्र मीन राशीत संक्रमण करत आहे. चतुष्पाद करणात व ऐंद्र योगात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळा. मन चिंताग्रस्त राहील.

वृषभ: 

आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण तणावात्मक राहील. कायदेशीर कामात विलंब होईल. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे संभाळा. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल.

मिथुनः 

आज प्रवासात वादविवाद टाळा. मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. स्थावराच्या देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. 

कर्क: 

आज विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर रहा.

सिंह: 

आज खर्चाला अनेक वाटा फुटतील. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. 

कन्या: 

आज प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. उत्पनात सुधारणा होतील. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. 

तूळ:

आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक: 

आज अनेक कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आळस दूर ठेवा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. 

धनु: 

आज जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता चांगला योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी राहाल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल.

मकरः 

आज कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. नवीन योजना यशस्वी होतील. थोडे धाडस दाखवा. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. इच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 

कुंभ: 

आज उत्तम दिवस आहे. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. धंद्यात वृद्धी होईल. राजकारणी लोकांना आपला मान-सन्मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. नोकरी व्यवसायात मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. 

मीन: 

आज अंहकारी वृत्तीमुळे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीसाठी खूप कष्ट करावे लागेल.

WhatsApp channel