मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 7 March 2024 : कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 7 March 2024 : कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 07, 2024 09:43 AM IST

Horoscope Today 7 march 2024: आज ७ मार्च २०२४ गुरुवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आजचे राशीभविष्य ७ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य ७ मार्च २०२४

आज भागवत एकादशीचा चंद्र शनिच्या नक्षत्रातुन आणि मकर राशीतून भ्रमण करतो आहे. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. जन मानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होऊ शकतात. 

वृषभः 

आज प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. आर्थिक पाठबळ मिळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.

मिथुन: 

आज नवीन वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. जुनी येणी वसूल होतील. अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.

कर्क: 

आज आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. 

सिंह: 

आज व्यक्तिमत्वात वाढ होईल. अनुकुल स्थिती राहील. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. 

कन्याः 

आज दिवस त्रासदायक ठरेल. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. व्यापार व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होईल. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. 

तूळ: 

आज अनेक घटना घडतील. भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वृद्धीचा दिवस राहील. मानधनात वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरेल. 

वृश्चिक: 

आज आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. स्थावर मालमत्तासंबंधी समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. 

धनुः 

आज कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. व्यवसायात भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. भागीदारासोबत वादविवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. 

मकर: 

आज तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळ पणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

कुंभ: 

आज अतीउत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.

मीन: 

आज कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. समाधानकारक दिवस असेल.