आज रविवार ७ जानेवारी रोजी, तूळ राशीतून वृश्चिक राशीत चंद्राच्या गोचरामुळे धन योग आणि कला योगाचा प्रभाव राहील. तसेच आज रविवारी सूर्य आणि मंगळ धनु राशीत असल्यामुळे आदित्य मंगल योग तयार होत आहे. या शुभ ग्रह संयोगांमध्ये मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य.
आज मंगलमय दिवस आहे. घरातील वाद संपतील, गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.
आज धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. मन प्रसन्न राहील.
आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. मोठा आर्थिक लाभ होईल. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील.
आज आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर मजेत वेळ घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापटपणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मन सकारात्मक होईल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील.
आज वैवाहीक जीवनात वाद टाळा. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. उधारी देणे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळा. विचारपूर्वक निर्णय घ्या. पत्नीशी कुटुंबातील इतर सदस्यांसी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मनोबल मानसिक स्वास्थ सांभाळा.
आज महत्त्वाची कामे रखडतील. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे तारेवरची कसरत होईल. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावामुळे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवू नका.
आज अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. काहींना वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.
आज चंद्राशी होणारा शुभ ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिक दृष्ट्या आमलात आणा. भाग्यदायक दिनमान राहील.
आज झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.
आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.
आज शुल योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील.
आज सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार दुखावेल, काम करण्यात आनंद वाटणार नाही. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून व व्यसनी मित्रांपासून दूर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे टाळा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी. घरातील वातावरण बिघडणार नाही याकडे लक्ष द्यावे.