मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 7 february 2024: कौतुकाचा व मान-सन्मानाचा बुधवार, तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 7 february 2024: कौतुकाचा व मान-सन्मानाचा बुधवार, तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 07, 2024 09:06 AM IST

Horoscope Today 7 february 2024: आज ७ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 7 february 2024
Today horoscope 7 february 2024

आज बुधवार ७ फेब्रुवारी रोजी, बुध प्रदोष व्रत असून, चंद्र धनु राशीत भ्रमण करतोय. चंद्र-शुक्राच्या संयोगात राजयोग घटित होत असुन वज्र योग देखील आहे. कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज नवीन कामकाजासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये विचार पटणार नाही. आर्थिक वाढ होईल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. पदोन्नती व प्रगती होईल. पत्नीचे सहकार्य मिळेल.

वृषभ: 

आज कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. परस्पर सहकार्य करा. मानसिक क्लेश वाढेल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. मोठी गुंतवणूक आज करू नये. प्रकृती वर लक्ष द्या. ताण जाणवेल.

मिथुनः 

आज घरात मंगलकार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

कर्कः 

आज समिश्र स्वरुपाचा दिवस राहील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्ये वाढ होऊ शकते. तुमची स्थिती उत्तम होईल. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.

सिंह: 

आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडेल. पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढेल.

कन्याः 

आज अंत्यत शुभ दिवस आहे. कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी नांदेल. उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळख मिळेल. मोठे अधिकारी भेटतील आणि प्रोत्साहन देतील. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.

तूळ: 

आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल असेच बोला. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आत्मविशास वाढेल व मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.

वृश्चिक: 

आज झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून सुवार्ता मिळेल. अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पडतील. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.

धनु: 

आज अशुभ परिणामांचा दिवस आहे. योग व व्यायामात सातत्य ठेवा. व्यर्थ खर्च टाळा. वैचारिक भेदामुळे कौटूंबिक नात्यामध्ये दूरावा येऊ शकतो. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होऊ शकते. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढू शकतात. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडेल. 

मकरः 

आज संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.

कुंभ: 

आज जास्त कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवीन संधी मिळेल. सौभाग्य योगात वृद्धी होईल. कर्ज मंजूर होईल. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.

मीन: 

आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.  सावधानीपूर्वक वाटचाल करावी.