मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 7 April 2024 : आजचा रविवार गृहसौख्यात भर पाडेल! मेष ते मीन सर्व राशींचे वाचा भविष्य!

Horoscope Today 7 April 2024 : आजचा रविवार गृहसौख्यात भर पाडेल! मेष ते मीन सर्व राशींचे वाचा भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 07, 2024 11:01 AM IST

Horoscope Today 7 April 2024 : आज ७ एप्रिल २०२४ रविवार रोजी, दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आजचे राशीभविष्य ७ एप्रिल २०२४
आजचे राशीभविष्य ७ एप्रिल २०२४

आज रविवार ७ एप्रिल रोजी, त्रयोदशीचा चंद्र कुंभ नंतर मीन राशीत संक्रमण करेल. विष्टि करणात व ब्रम्हा योगात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेषः 

आज शुभ कामासाठी दिवस मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे, किर्ती व मान सन्मान मिळेल. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

वृषभः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे योग येतील, त्यामुळे फायदाही होईल. आत्म विश्वासाने पावले पुढे टाकाल. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मन समाधानी व प्रसन्न राहील. 

मिथुनः 

आजच घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. थोडा तापट पणाही वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. 

कर्कः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. कोणाला जामीनही राहू नये. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. अतिरेक वृत्तीवर आळा घाला. विचारपूर्वक निर्णय घ्या.

सिंहः 

आज काही महत्त्वाची कामे रखडतील. तारेवरची कसरत करावी लागेल. नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा करू नका. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका.

कन्या: 

आज मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. उगीचच काळजी कराल आणि त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे.

तूळ: 

आज उधारी वसूल होईल. यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. व्यवसायात आपल्या मतावर ठाम राहणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. भरभरटीचा दिवस आहे. 

वृश्चिकः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. शारिरिक समस्या निर्माण होतील. घरगुती वातावरण चांगले राहील.

धनु: 

आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. कर्ज घेणे देणे टाळा. 

मकरः 

आज उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. 

कुंभः 

आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. कुटुंबावर खर्च होईल.

मीनः 

आज अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही.  

WhatsApp channel