आज विजया स्मार्त एकादशीचा चंद्र शुक्राच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. दिनमानावर शुक्राचा विशेष प्रभाव राहणार आहे. मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज रोजगारात उत्तम स्थिती राहील. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळेल. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल.
आज पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्च आवरता घ्या. वैचारिक भेदामुळे कौटूंबिक नात्यामध्ये दूरी येण्याचे योग आहेत. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागेल.
आज संधींना हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्तीसंबंधी काम सुरुळित पार पडेल. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.
आज व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.
आज व्यवसायाशी संबंधित नियोजन झाकून ठेवा. अडचणी उद्भवू शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. जुने आजार त्रास देतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.
आज नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. आनंददायी आहे. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. पत्नीकडून सहकार्य लाभेल.
आज देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुञ्जत घालू नका. भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये.
आज घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. जादा भांडवलाची गरज वाटेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील.
आज नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाईमध्येही वाढ होण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.
आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. थोराचे निर्णय लाभदायक ठरतील. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.
आज उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.
आज दिनमान उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
संबंधित बातम्या