आज शनिवार ६ जानेवारी रोजी, चंद्र शुक्राच्या तूळ राशीत आहे. चंद्र राहुच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून हर्षलशी प्रतियोग करीत आहे. वणिज करणात कोणत्या राशींना रोजगारात फायदा होणार! वाचा राशीभविष्य!
आज तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन कराल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. प्रवासातून लाभ होतील.
आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांच्या अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. मनात उत्साह राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे.
आज शुभ दिवस असेल. पाहुणे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र दुर्लक्ष करू नये. जास्त काम करावे लागेल. आपल्या शांत स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहिल. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यश देणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल.
आज तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रतिकूल वातावरण राहील. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल. मानसिक त्रास होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
आज आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. मित्रमैत्रिण व नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
आज काम पूर्ण कराल. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती होईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. भिती वाटत असेल तर व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.
आज आर्थिक बाबतीत अनुकुल दिवस आहे. भरपूर कष्ट करावे लागतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य निर्णयामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. मन प्रसन्न राहील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल.
आज अचानक धन लाभाच्या कोणत्याही मार्गाला न जाणेच योग्य ठरेल. शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. क्रोधामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवास जपूनच करावा. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरीने काम करा. भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गांनी व्यवहार जपुन करावेत. अन्यथा अडचणी वाढतील. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक स्वास्थ सांभाळा. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
आज सहकार्याची अपेक्षा कराल. परंतु निराशा पदरात पडेल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील तरी कामे व्यवस्थित पार कराल. परिस्थितीवर मात करण्यासाठी जोमाने, चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल.
आज घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडण टाळा. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा राहील. व्यापार-उद्योगात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी वसुल करताना नाकेनऊ येतील. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी मतभेद होतील.
आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे झोकून देणे तुम्हाला जास्त आवडेल, परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही. अतिव्यसनामुळे प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. देश-विदेशात फिरायला जाण्याचे योग आहेत.
आज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात राहाल तर बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहु शकते. अध्यात्म मन लागेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सांभाळून काम करा. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळा, फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. स्वतःची प्रकृती सांभाळा.