Horoscope Today 6 february 2024 : व्याघात व हर्षण योगात मंगळवारचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 6 february 2024 : व्याघात व हर्षण योगात मंगळवारचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 6 february 2024 : व्याघात व हर्षण योगात मंगळवारचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य!

Feb 06, 2024 09:30 AM IST

Horoscope Today 6 february 2024 : आज ६ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

horoscope today 6 february 2024
horoscope today 6 february 2024

आज मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी, आज षट्तिला एकादशीचा चंद्र गुरूच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातुन भ्रमण करतोय. व्याघात व हर्षण योगात कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज अनुकुल स्थिती राहील. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कलाकारांना चांगला वाव मिळेल. तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल. निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल.

वृषभः 

आज दिवस त्रासदायक ठरेल. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. जवळच्या मित्राच्या भरवशावर राहाल परंतु लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. व्यापार व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावातील लहरीपणा थोडा इतरांना जाचकच होईल. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. 

मिथुन: 

आज भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. मानधनात वाढ होईल. मान-सन्मान, पदवी, पुरस्कार मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. मनोरंजन करण्याकडे कल राहील.

कर्क: 

आज मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान-सन्मान मिळेल. जुनी येणी वसूल होतील.

सिंहः 

आज मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे तापटपणा वाढेल. भागीदारासोबत वादविवाद टाळा. धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. व्यवहार गुप्त ठेवा. दुखापतीची शक्यता आहे.

कन्या: 

आज आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. तुमची विलक्षण छाप पडेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. मोठा आर्थिक लाभ होईल.

तूळ: 

आज उत्साहात निर्णय घेऊ नका. थोडासुद्धा निष्काळजीपणा अंगलट येऊ शकतो. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. घरगुती समारंभासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांशी वाद संभवतात. कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.

वृश्चिक: 

आज कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. समाधानकारक दिवस असेल.

धनु: 

आज तोट्याचे प्रमाण वाढेल. पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. उतावीळपणा बाजूला ठेऊन कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. दिवस फायद्याचा ठरणार आहे. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. सहकार्य लाभेल. भांवडाकडून आर्थिक मदत मिळेल.

मकर: 

आज यश ठरतील. वैवाहिक बाबतीत वातावरण आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल. गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.

कुंभ: 

आज वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. सहकार्य तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. आत्म विश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.

मीन: 

आज आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

Whats_app_banner