Horoscope Today 5 March 2024 : योग्य संधी व यशाचा दिवस! कसा जाईल तुम्हाला मंगळवार, वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 5 March 2024 : योग्य संधी व यशाचा दिवस! कसा जाईल तुम्हाला मंगळवार, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 5 March 2024 : योग्य संधी व यशाचा दिवस! कसा जाईल तुम्हाला मंगळवार, वाचा राशीभविष्य!

Published Mar 05, 2024 06:00 AM IST

Horoscope Today 5 march 2024: आज ५ मार्च २०२४ मंगळवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य ५ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य ५ मार्च २०२४

आज नवमीचा चंद्र गुरूच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातुन गोचर करीत असुन गुरू- हर्षलशी संयोग करणार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींचे, वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज बुद्धीचा योग्य वापर कराल. धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. यशस्वी व्हाल. योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. मनोबल उंचावलेले असेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.

वृषभ: 

आज विचारपूर्वक निर्णय घ्या. संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ताणतणाव जाणवेल. युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल.

मिथुन: 

आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहील. मात्र अतिउत्साह टाळा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भरभरटीचा दिवस आहे. कामे पूर्णत्वास जातील.

कर्क: 

आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नवीन कल्पना नक्की मांडा.

सिंह: 

आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी. फसगत होऊ शकते.

कन्या: 

आज कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

तूळ: 

आज कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान-सन्मान वाढेल. उत्तम मोबदला मिळू शकतो. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल.

वृश्चिकः 

आज शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशा संदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिनमान आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.

धनुः 

आज कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

मकरः 

आज व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.

कुंभ: 

आजच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. रात्रीचे जागरण टाळा. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. 

मीन: 

आज कलाकारांची कला बहरेल. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. 

Whats_app_banner