Horoscope Today 5 January 2024: मेष ते मीन राशींसाठी चढ-उताराचा दिवस! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 5 January 2024: मेष ते मीन राशींसाठी चढ-उताराचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 5 January 2024: मेष ते मीन राशींसाठी चढ-उताराचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Jan 05, 2024 08:39 AM IST

Horoscope Today 5 January 2024: आज ५ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 5 january 2024
Today horoscope 5 january 2024

आज शुक्रवार ५ जानेवारी रोजी, चंद्र शुक्राच्या तूळ राशीत असून, चंद्र शनिशी नवमपंचम योग करणार आहे. तसेच, मंगळाच्या नक्षत्रातुन गोचर करणार आहे. आजच्या दिवसावर अनुक्रमे चंद्र, मंगळ आणि शुक्राचा प्रभाव राहील. वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद व प्रसिद्धी मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे काम वेगाने होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 

वृषभ: 

आज मानसिक स्वास्थ उत्तम राहील. नोकरी व व्यवसायात आलेल्या संकटावर मात कराल. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घ्याल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. अतिउत्साह टाळा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान-सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन: 

आज मानसिकता बिघडण्याची शक्यता आहे. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट दिवस राहील. मुलांशी मतभेद होतील. अतीभावनीक होणे टाळा. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक नुकसान होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहारात फसगत होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळा. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी येतील. चिंताग्रस्न मन राहील.

कर्क: 

आज बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिवस आहे. आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल. भरभराटीचा दिवस आहे.

सिंह: 

आज विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात भागीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. प्रवासयोग आहेत. आत्मविश्वासामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणाम मिळतील.  आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत बदल घडेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे.

कन्याः 

आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आध्यात्मिक प्रगती होईल. भाग्योदयकारक दिवस आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.

तूळ: 

आज मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळा. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. आहारात नियमितता ठेवा. अपचन व पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

वृश्चिकः 

आज उधारी वसूल होतील. एखादी गोष्ट उत्साहाने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे कराल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. मंगळाच्या प्रभावामुळे स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. गृहसौख्य व पत्नीची साथ मिळेल. व्यापारात लाभ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल.

धनु: 

आज कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका. व्यवहार काळजीपूर्वक करा.

मकर: 

आज नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लाभेल. संततीची अभ्यासात रुची वाढेल. दिवस शुभ आहे.

कुंभ: 

आज विचार पूर्वक निर्णय घ्या. कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. तुमच्यातील गुणांमुळे लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्या. पराक्रम व क्षमतेमुळे यश मिळेल. व्यापार उद्योगात प्रगती होईल. खर्च विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. 

मीन: 

आज दिवस विशेष आहे. प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी जुळणार नाही. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. परंतु तेथील वातावरण मात्र उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

 

Whats_app_banner